कार्य वृतांत:- दिनांक: २५ जानेवारी २०२५.
विश्व हिंदू परिषद, कर्वेनगर प्रखंडाच्या (छ. संभाजी महाराज जिल्हा) वतीने दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता श्रीरुक्मिणी विठ्ठल देवस्थान, कर्वेनगर येथे अतिशय भक्तिमय, उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात साप्ताहिक आरती, हनुमान स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आले.
यावेळी श्री. किशोरीजी चव्हाण (प्रांतमंत्री, विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत) उपस्थित होते, त्यांनी सदर उपक्रमाची स्तुती केली व त्याचबरोबर उपस्थित कार्यकर्त्यांना काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सुचना दिल्या ज्यामध्ये; संबंधित देवस्थानचे उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, इतर गणपती मंडळे, दुर्गा माता मंडळे यांना आरतीमध्ये सहभागी करून घ्यावे, आरतीला येणाऱ्या भाविक व कार्यकर्ते यांना आरती रचना सामजावुन मोठ्या संख्येने सामील करण्यासाठी प्रयत्न करावेत इत्यादी विविध विषयांवरती बहुमोल मार्गदर्शन केले.
यामुळे, उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना किशोरजींसोबत बोलून भेटून खूप आनंद झाला.
सदर आरती दरम्यान,
श्री. केतनजी घोडके (विभाग मंत्री, विश्व हिंदू परिषद, पुणे पश्चिम विभाग),
श्री. अतुलजी सराफ (विभाग सहमंत्री, विश्व हिंदू परिषद, पश्चिम विभाग),
सौ. ईशानीताई खिरे (मातृशक्ती संयोजिका, विश्व हिंदू परिषद, छ.सं.म.भाग),
सौ. संजीवनीताई चौधरी (संयोजिका, धर्म जागरण मंच),
कु. शुभमजी मुळुक(भाग मंत्री विश्व हिंदू परिषद, छ.सं.म.भाग)
श्री. अनिकेतजी मुळे (विशेष संपर्क सहप्रमुख, विश्व हिंदू परिषद छ.सं.म.भाग),
श्री. सतिशजी करकरे (कार्यकर्ते, बावधन प्रखंड),
श्री. कुणालाजी मोरे (कार्यकर्ते, विद्यापीठ प्रखंड ) व कर्वेनगर प्रखंडातील पदाधिकारी, संघ परिवारातील जेष्ठ नागरिक, मंदिर देवस्थानचे पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात भाविक हे उपस्थित होते.
वृत्तांकन :-
मयुर मधुकर बनकर,
धर्माचार्य संपर्क, वि.ह.प.
No comments:
Post a Comment