उपस्थितांना संबोधित करताना प्रमुख वक्त्या आणि अन्य मान्यवर
पुणे : दि २६ जानेवारी २०२५
विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती आणि दुर्गावाहिनीच्या वतीने, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि गोंडवनच्या महाराणी दुर्गादेवी यांच्या स्मरणार्थ महिलांचे मानवंदना संचलन आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, मातृशक्ती प्रांत संयोजिका प्रिया रसाळ, दुर्गावाहिनी संयोजिका सोनाली नाथ, माधवीताई सौंशी, ज्येष्ठ समुपदेशिका अर्चना देशपांडे, तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्र अभ्यासक लताआशाताई कोल्हटकर उपस्थित होते.
२६ जाने रोजी, सायंकाळी ४ वाजता पुण्याच्या गंजपेठ येथील, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथून संचलनाला सुरुवात झाली.
त्यानंतर --> महात्मा फुले वाडा --> मासे आळी --> मिठगंज पोलीस चौकी --> शितळादेवी चौक -->जैन मंदिर चौक --> सुभान शहा दर्गा चौक --> रांका ज्वेलर्स --> कस्तुरे चौक --> श्रमदान मारुती मंडळ --> क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे तालीम मार्गे पुन्हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे समारोप करण्यात आला. या संचालनामध्ये केशव शंखनाद पथक, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुकास्वरूप प्रशालेचे घोष पथक देखील सहभागी झाले होते. पथसंचालनाचे परिसरातील विविध संस्था, सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांकडून पुष्पविष्टी करून स्वागत करण्यात आले.
संचलनामध्ये ३५० दुर्गासह; एकूण ५०० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.
संचलनंतर, सभागृहामध्ये विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगी, सुरेखाताई कवडे यांनी परिपाठी गायन केले तर आशाताई टेकवडे यांनी घेतलेल्या त्रिवार ओंकार उद्घोषाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
दुर्गावाहिनीच्या सोनाली नाथ यांनी, उपस्थितांचा परिचय करून देऊन स्वागत केले; त्यानंतर शारदाताई रिकामे आणि माधवीताई सौंशी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मातृशक्तीच्या प्रिया रसाळ यांनी प्रास्ताविक मांडले. त्या म्हणाल्या;
" पराकोटीचा त्याग, समर्पण तसेच धैर्य आणि शौर्य यांचे मानबिंदू असणाऱ्या दुर्गादेवी आणि अहिल्यादेवी यांचा आदर्श महिलांपुढे राहावा यासाठीच मानवंदना संचलनाचे आयोजन करण्यात येत असते. पुणे परिसरातील अश्या प्रकारचे कदाचित हे पहिलेच संचलन असून, समाज जागृती साठी हे आवश्यकच आहे. महाराणी दुर्गादेवी यांचा संघर्षमय जिवनपट देखील रसाळ यांनी मांडला. "
यानंतर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री, किशोर चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केले, ते म्हणाले,
" माँसाहेब जिजाऊंसारखी मातृशक्ती जागृत झाली म्हणूनच छत्रपती शिवरायांसारखे तेजस्वी आणि वीर महापुरुष निर्माण झाले. आपले देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी भविष्यात छत्रपती शिवरायांसारखे वीर निर्माण करणे ही आजच्या मातृशक्तीची जबाबदारी आहे.
आज हिंदू समाजातील निष्पाप कन्या, लव्ह जिहादच्या षडयंत्राला बळी पडताना दिसत आहेत, हिंदू मुलींना फसवणाऱ्या, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना दुर्गावाहिनीचा धाक दाखवलाच पाहिजे. आपली बहीण, मैत्रीण ही कधीही कोणत्याही अत्याचाराची बळी ठरणार नाही याची काळजी देखील दुर्गावाहिनीने घेतली पाहिजे. "
यानंतर ज्येष्ठ समुपदेशिका, अर्चना देशपांडे यांनी उपस्थित महिला आणि युवतींना, सार्वजनिक किंवा वैयक्तिक आयुष्यात कितीही संकटे आली तरी न डगमगमण्याचा सल्ला दिला. तसेच हिंदू कुटुंबे एकत्रित राहण्यासाठी आवश्यक समुदेशन करण्याची हमी देखील दिली.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या लताआशा कोल्हटकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र उपस्थितांना सांगितले. त्या म्हणाल्या " अहिल्यादेवी या लहानपणापासूनच कर्तव्य दक्ष स्वभावाच्या होत्या, त्यांचा हाच गुण पारखून श्रीमंत बाजीराव पेशवे आणि श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी त्यांना होळकर घराण्याची सून करून घेतले. त्यांचा आणि खंडेराव होळकर यांचा विवाह पुण्याच्या शनिवार वाड्यात थाटात पार पडला होता.
मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला, मुलाप्रमाणे शस्त्र, शास्त्र, न्यायनिवाडे, राजकारण, युद्धकला अश्या प्रकारचे शिक्षण देऊन त्यांना राज्यकारभारात धुरंधर बनवले होते. पतीच्या निधनानंतर सती न जाता आपली रयत आणि धर्म यांच्यासाठीच स्वतः ला वाहून घेतले. आपल्या कर्तृत्वाच्या आणि गुणग्राहकतेच्या जोरावर माहेश्वर सारखी सर्वगुणसंपन्न राजधानी उभी करून दाखवली.
प्रसंगी पोटच्या मुलाला देखील शासन करणारे कर्तव्य कठोर न्यायदान देखील त्यांनी केले. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे चरित्र म्हणजे तत्त्वनिष्ठेचे मूर्तस्वरूपच होते असे प्रतिपादन त्यांनी केले. उपस्थित सर्वांना अहिल्यादेवींच्या आदर्श पुढे ठेऊन, कोणत्याही प्रसंगी आपली तत्वे आणि निष्ठा यांच्यापासून मागे हटू नका असे आवाहन देखील कोल्हटकर यांनी केले."
दुर्गवाहिनीच्या तमन्ना पांडे आणि समृद्धी सराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर गायत्री देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
कृष्णा चितळे यांनी सांगितलेल्या शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर इस्कॉन मंदिर कात्रज यांच्या वतीने राम खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला.
हे संचलन यशस्वी होण्याकरता, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
स्त्रीशक्तीचा जागर तसेच दर्शन घडवणारा एक अनोखा उपक्रम राबवल्याबद्दल कार्यकर्त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
छायाचित्रण आणि वृत्तांकन.
प्रचार-प्रसिद्धी विभाग ( विश्व हिंदू परिषद )
No comments:
Post a Comment